उध्दव ठाकरेंसाठी ढसाढसा रडणारे आमदार एकनाथ शिंदे गटात सामिल
शिवसेनेतील आणखी एका आमदारानं बंडखोरी केलीय. हिंगोलीच्या कळमनुरीचे आमदार संतोष बांगर हे एकनाथ शिंदेंच्या गटात सामिल झालेत.
बांगर यांच्या बंडखोरीमुळे शिंदे गटातील आमदारांची एकूण संख्या 40 वर पोहोचली आहे.
रविवारी (3 जुलै) विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीत संतोष बांगर यांनी शिवसेनेचे उमेदवार आमदार राजन साळवी यांच्या बाजूनं मतदान केलं होतं.
मुंबई : एकनाथ शिंदे आणि भाजपच्या रेट्यापुढे कसेबसे १६ आमदार थोपवून धरलेल्या शिवसेनेला सोमवारी सकाळी आणखी एक धक्का बसला. अगदी कालपर्यंत शिवसेनेसोबत असलेले आमदार संतोष बागर हे एकनाथ शिंदे गटात सामील झाल्याचे दिसत आहे.
अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी संतोष बांगर हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत दिसून आले. त्यामुळे शिवसेनेचा आणखी एक आमदार एकनाथ शिंदे गटात दाखल झाला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या बंडखोर आमदारांची संख्या ४० वर जाऊन पोहोचली आहे. संतोष बांगर हे सोमवारी सकाळी एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांसोबत बसमध्ये चढताना दिसून आले.
Mumbai | Another Shiv Sena MLA of Uddhav Thackeray faction, Santosh Bangar, seen with Maharashtra CM Eknath Shinde and MLAs of his faction.
Bangar had left with the Shinde faction MLAs from hotel this morning and arrived with them at the Assembly now. pic.twitter.com/yeUXC8iZqU
— ANI (@ANI) July 4, 2022
त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. अगोदरच विधिमंडळ सचिवालयाने एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचा अधिकृत गटनेता आणि भरत गोगावले यांना प्रतोद म्हणून मान्यता दिल्याने शिवसेनेच्या अडचणीत भर पडली होती. त्यामध्ये आता आणखी एक आमदार साथ सोडून गेल्याने शिवसेनेची अवस्था आणखीनच बिकट झाली आहे.