आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी राष्ट्रवादी सोडल्याच्या चर्चेला सोशल मीडियावर उधान

 

पक्षांतर्गत गटबाजीमुळे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. राष्ट्रवादी पक्षांत असलेल्या गटबाजीमुळे राजीनामा दिल्याचे त्यांनी मान्य केले. आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या राजीनाम्याने त्यांच्या गटात नाराजीचे वातावरण आहे. दुर्राणी नाराज असल्याने पक्ष सोडण्याची चर्चा रंगली आहे. या चर्चेने सर्वत्र गोंधळ उडाला असून जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या समर्थकांनी दुर्राणी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या समर्थकांची एकच प्रतिक्रिया आहे की, ते दुर्राणींसोबत पक्ष सोडण्याच्या मार्गावर आहेत. दुर्राणी यांची नाराजी दूर होणार का? दुर्रानी यांनी पक्षाची धुरा यशस्वीपणे सांभाळी, प्रत्येक कार्यकर्त्यांचे समस्येचे निराकरण केले. प्रत्येक कार्यकर्त्याला पाठबळ दिले.

तसेच आजवर राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाभरात अधिक कसा बळकट होईल यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले. आता पक्षनेतृत्वाने आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या भावनांचा विचार करावा असे सर्व सामान्य कार्यकर्त्यांचे मत बनले आहे. आमदार बाबाजानी दुर्राणी दीर्घकाळापासून पक्षासोबत आहेत. दुर्राणी यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यास जिल्ह्यात पक्षाला मोठे भगदाड पडणार? यात मात्र काही शंका नाही. दुर्रानी यांच्या राजीनाम्यामुळे येत्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Team Global News Marathi: