अल्पवयीन मुलीने सासरी नांदायला नकार दिल्यामुळे जन्मदात्या पित्याने नदीत दिले ढकलून

 

कोल्हापूर | सासरी नांदायला नकार देणाऱ्या अल्पवयीन मुलीला बापानेच नदीत ढकललं असल्याचा संशय आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड पोलिसांनी मुलीच्या वडिलांना ताब्यात घेतलं असून चार दिवसांपूर्वी पित्यानेच मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात दिली होती. आता मुलीचा मृतदेह दूधगंगा नदी पात्रात आढळला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार मुलगी अल्पवयीन असतानाही बापाने तिचा विवाह जबरदस्ती लावून दिला होता. सासरी नांदायला नकार दिल्याने बापानेच तिला नदीत ढकलून जीवे मारल्याची प्राथमिक माहिती आहे. चार दिवसांपूर्वी पित्यानेच मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार कोल्हापुरातील कुरुंदवाड पोलिसात दिली होती.

बेपत्ता असलेल्या १७ वर्षीय मुलीचा मृतदेह दूधगंगा नदी पात्रात आढळला आहे. त्यानंतर पोलिसांनी मुलीच्या वडिलांना ताब्यात घेतलं आहे. कुरुंदवाड पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.मारा सदर घडलेल्या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Team Global News Marathi: