मंत्री एकनाथ शिंदे समर्थक आमदारांसह अहमदाबादमध्ये ?

 

विधान परिषेद निवडणुकीच्या पराभवानंतर राजकीय हालचालींना वेग आला असून या निवडणुकीनंतर सर्वात मोठा धक्का शिवसेनेला बसणार असल्याची माहिती खात्रीदायक सूत्राच्या माध्यमातून समोर येत आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे आपल्या काही समर्थक आमदारांसह नॉटरिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. त्यावरून शिवसेनेत खळबळ उडाली.

काल झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेचे तीन मते फुटल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली होती. यानंतर एकनाथ शिंदे हे आपल्या समर्थक आमदारांसह नॉट रिचेबल झाले आहेत. आज सकाळी ते गुजरातमधील अहमदाबाद येथील एका हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत. यामुळे खळबळ उडाली आहे.

अपक्ष आमदारांसारखेच शिंदे समर्थक आमदारांमध्ये नेतृत्वाबाबत प्रचंड नाराजी आहे. गेली अडीच वर्ष आम्हाला फारशी किंमत दिली जात नव्हती. आता मात्र आम्हाला नव-नवे आदेश देऊन, आमच्यावर अविश्वास दाखवला जात आहे, अशी भावना शिंदे समर्थक आमदारांनी खासगीत मांडली आहे. यातच एकनाथ शिंदे हे आपल्या समर्थक आमदारांसह भाजपमध्ये दाखल होण्याची चर्चा सुरू असल्याने राज्य सरकार धोक्यात आल्याचे मानले जात आहे. यात आज नेमके काय होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे

Team Global News Marathi: