मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा अभिनेता किरण मानेंना पाठिंबा

 

मुलगी झाली हो’ या मालिकेत भूमिका करणारे अभिनेते किरण माने यांना बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर राज्यात कला क्षेत्रात खळबळ उडाली आहे. लोकांकडून माने यांना पाठिंबा मिळत असून सोशल मीडियावर Stand With Kiran Mane ही मोहीम मोठ्या ताकदीने राबवली जात आहे. तसेच विविध पक्षातील नेत्यांनी सुद्धा किरण माने यांना पाठिंबा दर्शवला आहे.

दरम्यान, राज्यातील बडे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी किरण माने यांना पाठिंबा दर्शविला आहे. माने केंद्र सरकारविरोधात (Central Government) लिहतात म्हणून त्यांना हटवलं गेलं. कुणाच्या भाकरीवर टाच आणणं चुकीचं आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय. त्यांनी आपली भूमिका ट्विटद्वारे मांडली आहे. तसेच त्यांच्यामागे खंभीरपणे उभे राहण्याचे आश्वासन सुद्धा दिले आहे.

“या महाराष्ट्रात दादा कोंडके, पु.ल. देशपांडे, निळू फुले या कलाकारांनी कधी टीका केली तरी त्यांच्या विचारांचा आदर करीत त्यांचा सन्मानच केला गेला. याद राखा, हा महाराष्ट्र वैचारिक वारसा जोपासतो. स्टार प्रवाहावरील “मुलगी झाली हो” या मालिकेतील विलास पाटील पात्र साकारणाऱ्या किरण माने हा अभिनेता फुले, शाहु, आंबेडकर विचारांची कास धरुन सोशल मिडीयावर लिहतो. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांबद्दल प्रश्न विचारतो, म्हणून अचानक मालिकेतूल काढुन टाकले गेले. तुमच्या विरोधात लिहिले म्हणून तुम्ही जर कोणाच्या भाकरीवर टाच आणणार असाल तर ते योग्य नाही,” असं जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

 

Team Global News Marathi: