एमआयएमच्या आघाडीत येण्याच्या प्रस्तावावर शरद पवार यांनी दिली प्रतिक्रिया

 

मुंबई | एमआयएमने महाविकास आघाडीला दिलेल्या युतीच्या प्रस्तावावरून सध्या अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे. सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही पक्षांकडून या विषयावर प्रतिक्रिया येत आहेत. अशातच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हा प्रस्ताव नाकारला असला, तरी भाजपनं मात्र महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार बारामीत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. पवार यांना एआयएमआयएमच्या प्रस्तावावर प्रतिक्रिया विचारली असता पवार यांनी मात्र अशी शक्यता फेटाळून लावली आहे. कुणी कुठल्या पक्षासोबत जायचं हे ते स्वत: सांगू शकतात. परंतु, ज्यांच्यासोबत जायचंय त्या पक्षाने तरी होय म्हटलं पाहिजे. हा राजकीय निर्णय आहे. हा निर्णय महाराष्ट्रापुरता कुणी प्रस्तावित केला असला तरी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष म्हणून अशा प्रकारचा राजकीय निर्णय राज्याला घेण्याचा अधिकार देत नाही.

पुढे बोलताना पवार म्हणाले की, सदर निर्णय राज्याला या संबंधित घेऊ शकता हे तो पर्यंत राष्ट्रीय समितीने स्पष्ट केले नाही, तो पर्यंत कोणत्याही राज्यात अशा प्रकारची भूमिका ते घेऊ शकत नाही. त्यामुळं महाराष्ट्रात गेली दोन दिवस जो एमआयएमबाबत ज्या बातम्या येतायत तो पक्ष निर्णय नाही, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.

Team Global News Marathi: