मिलिंद नार्वेकरांचं ‘मातोश्री’शी भांडण झालं की काय?, कळतं नाही – चंद्रकांत पाटील

 

मुंबई | शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर याचं मातोश्रीसोबत भांडण झालं आहे की काय अशी शंका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केली आहे. नार्वेकर यांनी आज बाबरी मशीद पाडल्याच्या घटनेला २९ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त एक ट्विट केलं आहे. या ट्विटच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांना प्रश्न विचारत सेनेवर निशाणा साधला होता.

अयोध्येमधील राम मंदिर निर्माण करण्यासाठी शिवसैनिकांनी केलेल्या बलिदानाला कोटी कोटी प्रमाण असा मजकूर असणारा बाबरी मशिद पाडतानाचा जुना फोटो नार्वेरकांनी आज सकाळी सव्वा अकराच्या सुमारास ट्विट केलाय. या ट्विटमुळे विरोधकांनी थेट सेनेवर निशाणा साधला होता तसेच अनेक प्रश्न सुद्धा उपस्थित केले होते.

“मिलिंद नार्वेकरांनी हे ट्विट करणं म्हणजे महाविकास आघाडीच्या पायालाच सुरुंग लावणं आहे. धर्मनिरपेक्ष आणि अल्पसंख्यांकांचं लांगुनचालन यावरच महाविकास आघाडी आहे ना? यावरच महाविकास आघाडीचा मीनार उभा आहे. त्यांचं (नार्वेकरांचं) मातोश्रीशी भांडणं झालं की काय कळत नाही. त्यांनी असं ट्विट करणं हे त्यांच्या (महाविकास आघाडीच्या) पायाला सुरुंग लावण्यासारखं आहे,” असा टोला पाटील यांनी लगावला आहे.

Team Global News Marathi: