मविआ सरकार कोसळताच शिवसेनेला काँग्रेसने दिला आणखी एक धक्का

 

काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या पहिल्या क्रमांकांच्या उमेदवाराला मतदान न करणाऱ्या व विश्वासमताच्या वेळी हेतुपुरस्सर गैरहजर राहिलेल्या आमदारांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचे संकेत काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी दिले आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी काँग्रेसाध्यक्ष सोनिया गांधी यांना या संदर्भातील अहवाल सादर केला.

या बैठकीला काँग्रेसचे नेते राहुल गांधी, काँग्रेसचे सरचिटणीस (संघटन) के. सी. वेणुगोपाल उपस्थित होते. २० जूनला झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे पराभूत झाले हाेते. हंडोरे यांना पहिल्या पसंतीची मते न मिळाल्याने पराभव झाला. यासाठी काँग्रेसमधील काही आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याची कबुली पटोले यांनी अहवालात दिल्याचे समजते.

विश्वास ठरावाच्या वेळी गैरहजर राहिलेल्या आमदारांच्या हेतूंवर संशय व्यक्त करण्यात आला. क्रॉस व्होटिंग करणारे व विश्वासमताच्या वेळी गैरहजर राहिलेले सात सदस्य कॉमन असल्याचेही नाना पटोले यांनी पक्षश्रेष्ठींच्या निदर्शनास आणून दिले. गैरहजर राहिलेल्या काही सदस्यांनी पक्षाची पूर्वपरवानगी घेतली होती, असेही पटाेले यांनी सांगितले.

मुंबई महापालिका निवडणूकमुंबई महापालिकेची आगामी निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार आहे अशी माहिती नाना पटोले यांनी दिली आहे. काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवावी असे मत नाना पटोले यांनी याआधीही मांडले होते. या निर्णयामुळे शिवसेनेला आगामी मुंबई महानगर पालिका जड जाणार असेच चित्र दिसून येत आहे.

Team Global News Marathi: