अयोध्येत छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख, हा महाराष्ट्राचा गौरव – छत्रपती उदयनराजे भोसले

अयोध्येत छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख, हा महाराष्ट्राचा गौरव – छत्रपती उदयनराजे भोसले

अयोध्येत ५ ऑगस्ट रोजी राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख आपल्या भाषणात केला होता. यावर खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी वक्तव्य केले आहे.

‘अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या ऐतिहासिक क्षणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवछत्रपतींचा व मावळ्यांचा केलेला उल्लेख हा आपल्या महाराष्ट्राचा सन्मान व गौरव आहे,’ अशी भावना भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे.

अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा बुधवारी पार पडला. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मंदिराची कोनशिला ठेवण्यात आली. मंत्रोच्चाराच्या साक्षीने हा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी देशाला संबोधून छोटेखानी भाषण केले.

भाषणात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यस्थापनेचा उल्लेख केला होता. ‘ज्याप्रमाणे मावळे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या कार्यात निमित्त झाले, त्याचप्रमाणे देशातील सर्व जनतेच्या सहकार्यानं राम मंदिराच्या पुनर्निमाणाचे पुण्य कार्य होऊ घातले आहे,’ असं मोदी म्हणाले होते

ग्लोबल न्युज नेटवर्क: