‘मला खासदार करण्यात अब्दुल सत्तार यांचा मोठा वाटा’; जलील यांचे मोठे विधान

 

औरंगाबाद | एमआयएमचे औरंगाबादचे खासदार आणि प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी आज एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.त्यांच्या या विधानाने मोठा वाद निर्माण होण्याचे चिन्ह दिसून येत आहे. २०१९ मध्ये झालेल्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून मला खासदार करण्यात शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा मोठा वाटा होता”, असा गौप्यस्फोट इम्तियाज जलील यांनी केला आहे.

अब्दुल सत्तार आणि इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीत वैजापूर तालुक्यात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमात बोलताना इम्तियाज जलील म्हणाले की, ”आज मी लोकसभेत आहे, ते अब्दुल सत्तार यांच्यामुळे. मला खासदार करण्यात अब्दुल सत्तार यांचा मोठा वाटा आहे,” असा गौप्यस्फोट जलील यांनी केला आहे. यावेळी मंचावर अब्दुल सत्तार हेही उपस्थित होते.

इम्तियाज जलील २०१९च्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबादमधून निवडून आले आहेत. एआयएमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीने निवडणूक सोबत लढली होती. इम्तियाज जलील यांनी तत्कालीन खासदार आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला होता.

Team Global News Marathi: