मुद्दा एकच, माझ्या बाबांना मुख्यमंत्री करा; या नेत्याने लगावला आदित्य ठाकरेंना जोरदार टोला

युवासेना प्रमुख आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा वरळी मतदारसंघ आहे. आमदार पदाच्या तिसऱ्या वर्षपूर्तीनिमित्ताने माजी मंत्री आणि स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांनी वरळीकारांशी पत्राद्वारे संवाद साधला. वरळीकरांना भावनीक साद घालत त्यांनी अप्रत्यक्षरित्या एकनाथ शिंदे गटावर देखील टीका केली. शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी प्रत्युत्तर देत आदित्य ठाकरे यांना खडेबोल सुनावले.

आदित्य ठाकरे ते तोडगा काढू शकले नाही. पण, त्यांनी पत्र लिहिलं. भावनिक पत्र लिहायची. भावनिक आवाहन करून मतही घ्यायची. कधी आम्हाला त्रास कसा होतो, हे दाखवायचं. कधी बाळासाहेब ठाकरे यांचं नाव सांगायचं. कधी वडील आजार आहेत, हे दाखवायचं. पण, मुद्दा एकच आहे, माझ्या बाबांना मुख्यमंत्री करा. प्रश्न कुठलेचं सोडवायचे नाहीत, असा टोला पावसकर यांनी लगावला .

तसेच त्यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर देखील निशाणा साधला. “महाआघाडीचे प्रवक्ते म्हणून संजय राऊत हे काम बघतात. कोणी काही वाईट बोललं की, महाराष्ट्राची संस्कृती काय हे समोर येते. सुसंस्कृतपणा दाखविला जातो. दुसऱ्यांना रेडे-म्हशी म्हणा. हा यांचा सुसंस्कृतपणा आहे. त्यामुळं ते कितीही बाहेर आले. आतमध्ये गेले. बाहेर आले. पुन्हा आतमध्ये गेले. तरी ते सुधारतील, असं वाटतं नाही, असे म्हणत पावसकर यांनी राऊतांना धारेवर धरले.

 

Team Global News Marathi: