माझा एक मुलगा वकिली करतोय, कधीही टीईटी परीक्षा न देता त्याचं नाव पात्र यादीत कसे?

 

शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांच्या एका मुलाचं आणि मुलीचं नाव राज्यभर गाजत असलेल्या टीईटी घोटाळ्यात समोर आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. तर हे सर्व आरोप खोटे असून, मला बदनाम करण्यासाठी केलेला खोडसाळपणा असल्याचं अब्दुल सत्तार म्हणाले आहेत. तर माझ्या ज्या मुलाचे नाव या यादीत आले आहे, त्याने कधीही टीईटी परीक्षा दिली नसून, तो एलएलबी (कायद्याच्या अभ्यास) करत असल्याचा खुलासा सत्तार यांनी केला आहे.

माध्यमांशी बोलताना सत्तर म्हणाले की, माझ्या दोन्ही मुलींनी टीइटीची परीक्षा दिली आहे. मात्र त्या अपात्र ठरल्या होत्या. त्यामुळे त्यांचा याच्याशी काहीही संबध नाही. आता चार वर्षांनी पात्र झाल्याची यादी समोर आली आहे, याचा उपयोग कुठेतरी शिक्षक विभागाशीच असतो. जर आम्ही काही केले असते तर शिक्षण अधिकाऱ्यांकडे नोकरी मागितली नसती का?, त्यांना प्रमाणपत्र दिला नसता का?, माझ्या मुलींनी घोटाळा केला असता तर आम्ही चार वर्षे त्याचा फायदा घेतला नसता का?, असा प्रश्न सत्तार यांनी उपस्थित केला.

टीईटी घोटाळ्यात समोर आलेल्या यादीतील जी नावं रद्द करण्यात आली आहे, त्यात अब्दुल सत्तार यांच्या एका मुलाचे सुद्धा नाव आहे. यावर बोलतांना अब्दुल सत्तार म्हणाले की, माझा मुलगा वकिलीचा अभ्यास करतोय, त्याने कधीही टीईटीची परीक्षा दिली नाही. मात्र आता त्याचे नाव सुद्धा टीईटी परीक्षेच्या पात्र यादीत कसे आले असा प्रश्न सत्तार यांनी उपस्थित केला आहे.

Team Global News Marathi: