“माझं मत बाद करण्याचा सरकारचा डाव” ; रवी राणांनी साधला आघाडीवर निशाणा

 

राज्यसभा निवडणुकीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी नि विरोधकांमध्ये शीतयुद्ध पेटलेले असताना आता अपक्ष आमदारांना हाताशी धरून सहावा उमेदवार निवडणून आण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी प्रयत्न सूर केले आहे अशातच आता राज्यसभेच्या मतदानापासून दूर ठेवण्यासाठी आम्हाला नोटीस देण्यात आली, असा गंभीर आरोप आमदार रवी राणा यांनी ठाकरे सरकारवर केला आहे.


हनुमान चालिसा प्रकरणात पोलिसांनी राणा दाम्पत्याला मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आणि आज न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. राणा यांच्या विरोधात पोलीस आता दोषारोप पत्र देखील दाखल करणार आहेत. रवी राणा मध्य रात्री दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यामुळे रवी राणा आज न्यायालयासमोर हजर राहणार नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. राज्यसभेसाठी माझं मत बाद करण्याचा राज्य सरकारचा डाव असल्याचा आरोप रवी राणा यांनी केला आहे. तर खासदार नवनीत राणा अमरावतीमध्ये आहेत.

महाराष्ट्र विधानसभेतील छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांचे भाव सध्या गगनाला भिडलेले आहेत. या आमदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी महाविकास आघाडी आणि प्रमुख विरोधी पक्ष भाजप यांच्यात स्पर्धा आहे. त्यांना विविध प्रकारचे प्रोत्साहन दिले जात आहे. १० तारखेला राज्यसभेसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापु लागले आहे.

Team Global News Marathi: