माझ्या मुलाला आयुष्यातून उठवण्याचे ज्यांनी प्रयत्न केले त्यांच्यासोबत तुम्ही गेलात

 

मुंबई | काही दिवसांमध्ये शिवसेनेत मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. यादरम्यान उद्घव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. याच घडामोडींवर आता उद्धव ठाकरे यांना पत्रकार परिषद घेत संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या.

माशाच्या डोळ्यातील अश्रू कोणाला दिसत नाहीत, असं त्यांनी आपल्या भावना मांडताना सांगितलं. धनुष्यबाण शिवसेनेपासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही – उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला खडसावलं मलाही वाईट वाटलं, मलाही मन आहे, असं उद्धव ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले.

माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे. येत्या १२ तारखेला सुनावणीचा निकाल येईल तो शिवसेनेच्या भविष्याचा निकाल नसेल. पण या केसमुळे देशात लोकशाहीचं भविष्य किती काळ मजबूत राहणार आहे. आंबेडकरांच्या घटनेनुसार कारभार होणार आहे का हे सांगणारा हा निकाल असेल.

हा निकाल देशाच्या लोकशाहीची वाटचालीची दिशा दाखवणारा निकाल ठरेल, असंही ठाकरे म्हणाले बंडखोर आमदारांना सुनावलं – सुरतेला जावून बोलण्यापेक्षा सुरत दाखवून बोलला असता तर बरं झालं असतं. तुमचं इतकं प्रेम आहे तर घराण्यावर टीका करत असताना का विरोध केला नाही. विकृत टीका करणा-यांच्या मांडीला मांडी लावून बसला आहात.

तसेच माझ्या मुलाला (आदित्य ठाकरे) आयुष्यातून उठवण्याचे ज्यांनी प्रयत्न केले त्यांच्यासोबत तुम्ही गेलात. हे करण्यापेक्षा परत एकदा विधानसभेची निवडणूक घ्या, असंही ठाकरे म्हणाले.

Team Global News Marathi: