मविआ सरकार विद्यार्थ्यांच्या पाठीशी; विद्यार्थ्यांना पुढे करून राजकारण करु नये

 

राज्यातील अनेक ठिकाणी सोमवारी अचानक शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले. मुंबईत विद्यार्थ्यांनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरालाही घेराव घातला होता. त्यामुळे विध्यार्थ्यांच्या या आंदोलनामुळे मुंबईत परिस्थिती काही चिघळली दिसून आली होती यावेळी मोठी गर्दी पाहता विद्यार्थ्यांना पागवण्यासाठी पोलीसांना सौम्य लाठीमारही करावा लागला.

मात्र दुपारनंतर या घटनेसंदर्भात हिंदुस्थानी भाऊचे नाव समोर आले. हा हिंदूस्थानी भाऊ नेमका कोण, तो कोणत्या पक्षाशी संबंधित आहे, त्याचा नेमका उद्देश काय आहे त्याचा शोध घेण्यात आला मात्र या घटनेनेनंतर राजकीय प्रतिक्रिया उमटताना दिसून येत आहे, अशातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपले मत मांडले आहे.

दहावी, बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घ्याव्यात या मागणीसाठी हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. या विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरवून त्यांच्या भवितव्याशी खेळणे अत्यंत चुकीचे आहे. आघाडी सरकार विद्यार्थ्यांच्या पाठीशी असून त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यावर चर्चा करुन सरकार मार्ग काढेल परंतु कोणाच्यातरी सांगण्यावरून विद्यार्थ्यांनी चुकीचा मार्ग अवलंबू नये, असे आवाहन महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

यासंदर्भात बोलताना पटोले पुढे म्हणाले की, कोरोनामुळे मागील दीड वर्षापासून शाळा, कॉलेज बंद असली तरी शिक्षणात खंड पडू नये व विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून मविआ सरकारने ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरुच ठेवलेले आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्यसुद्धा तेवढेच महत्वाचे आहे. शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून त्या पूर्ववत सुरु कराव्यात तसेच परीक्षा ऑफलाईन घ्याव्यात अशी मागणीही मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. सर्व बाजूंनी विचार करूनच सरकारने निर्णय घेतलेला आहे.

Team Global News Marathi: