मतदानापूर्वी आघाडीत बिघाडीची चर्चा; पवारांच्या निर्णयाने मुख्यमंत्री नाराज?

 

राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. या निवडणुकीत एक-एक मतदान अत्यंत महत्त्वाचे आहे आणि आपला उमेदवार विजयी करण्यासाठी राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. मात्र, त्याच दरम्यान महाविकास आघाडीच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांत नाराजी असल्याची चर्चा होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मतांचा कोटा कमी करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं आहे. सूत्रांकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ऐनवेळी उमेदवारांसाठीचा मतांचा कोटा बदलला.

42 ऐवजी कोटा बदलून 44 केला आणि त्यामुळेच शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. मतांचा कोटा 42 वरुन 44 इतका झाल्यास त्याच फटका शिवसेना उमेदवाराला बसेल आणि शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार हे अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली. यामुळेच शिवसेनेत नाराजी असल्याचं बोललं जात आहे.

अखेर सस्पेन्स संपला, खासदार इम्तियाज जलील यांनी केली घोषणा राज्यसभा निवडणुकसाठी आज मतदान होतंय. त्यासाठी महाविकास आघाडीच्या 4 उमेदवारांचा निर्धारीत विजयी कोटा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल अचानक बदलल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्तं केली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुन्हा सारवासारव करण्यात येत आहे. महाविकास आघाडीने ठरवल्याप्रमाणे सर्व आमदारांना निर्धारीत विजयी कोटा देण्या संदर्भात पुन्हा चाचपणी करण्यात येत आहे.

Team Global News Marathi: