मारहाणीच्या व्हिडीओवर आमदार संतोष बांगरांचे उत्तर, म्हणाले की,

 

सतत कोणत्या-कोणत्या वादामुळे चर्चेत असणारे कळमनुरीचे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर पुन्हा एका नवीन वादात सापडले आहे. हिंगोली शहरालगत असल्यास शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राचार्य अशोक उपाध्याय यांना आमदार बांगर शिवीगाळ करत मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे सर्व स्थरातून त्यांच्यावर टीका होताना दिसून येत आहे.

दरम्यान या सर्व प्रकरणावर खुद्द आमदार बांगर यांनी खुलासा केला आहे. मारहाण करण्यात आलेल्या प्राचार्याने एका महिलेवरती अन्याय केला होता. त्यामुळे माहिलेवर अत्याच्यार होताना छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात संतोष बांगर सहन करणार नाही. यासाठी माझ्यावर गुन्हा दाखल झाला तरी त्याची पर्वा नसल्याचं बांगर यांनी म्हंटले आहे.

औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये 2023-24 च्या आराखड्याची बैठकीसाठी आलेल्या बांगर यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे की, सरकार आमचंच आहे, मात्र सरकारमध्ये राहून आवाज उठवावा लागतो. आम्ही काय हातात बांगडया घातल्यात का? अन्यायाविरोधात लढा देणे शिवसैनिकाच कर्तव्य आहे. त्या प्राचार्याने एका महिलेवरती अन्याय केला होता. त्यामुळे माहिलेवर अत्याचार होताना छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात संतोष बांगर सहन करणार नाही.

तसेच या घटनेसाठी माझ्यावर गुन्हा दाखल झाला तरीही चालेल. तसेच संबंधित महिलेची इज्जत चव्हाट्यावर येऊ नये, म्हणून आम्ही गप्प बसलो आहे. अन्यथा प्राचार्यावरती गुन्हा दाखल झाला असता, असेही बांगर म्हणाले. तर घटना होऊन आठ दिवस झाले असताना त्या प्राचार्यांने माझ्यावर गुन्हा का दाखल केला नाही, असाही प्रश्न बांगर यांनी उपस्थित केला

Team Global News Marathi: