२८ मार्चला आहे पापमोचिनी एकादशी, जाणून घ्या पूजेचा मुहूर्त आणि महत्त्व

२८ मार्चला आहे पापमोचिनी एकादशी, जाणून घ्या पूजेचा मुहूर्त आणि महत्त्व

२८ मार्चला आहे पापमोचिनी एकादशी, जाणून घ्या पूजेचा मुहूर्त आणि महत्त्व

पापमोचिनी एकादशी ही सर्व एकादशींमध्ये सर्वाधिक महत्त्वाची तिथी

या दिवशी मनोभावे विष्णू देवाची पूजा केली आणि व्रत पाळले तर पुण्य लाभते, अडचणी आणि संकटे दूर होतात

Papmochani Ekadashi 2022 Date and Time For Puja : भारतीय संस्कृतीत प्रत्येक एकादशीचे निराळे असे महत्त्व आहे. विष्णुपुराणातील एका कथेनुसार प्रत्येक वैष्णवाने एकादशीच्या व्रताचे पालन करावे. प्रत्येक इंग्रजी महिन्यात दोन वेळा एकादशी येते. एक एकादशी कृष्ण पक्षात आणि दुसरी एकादशी शुक्ल पक्षात येते. चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी अर्थात पापमोचिनी एकादशी यंदा सोमवार २८ मार्च २०२२ रोजी आहे. पापमोचिनी एकादशी ही सर्व एकादशींमध्ये सर्वाधिक महत्त्वाची तिथी समजली जाते. या दिवशी मनोभावे विष्णू देवाची पूजा केली आणि व्रत पाळले तर पुण्य लाभते. सुखांचा लाभ होतो. अडचणी आणि संकटे दूर होतात. मोक्षाचा मार्ग मोकळा होतो.

पापमोचिनी एकादशी या दिवशी केलेले व्रत आरोग्य, संतानप्राप्ती, प्रायश्चित यासाठी महत्त्वाचे आहे. विष्णू म्हणजे सृष्टीचा संरक्षक. चांगल्याचे रक्षण करणारा देव. विष्णूचा अवतार अर्थात भगवान श्रीकृष्ण यांनी स्वतः युधिष्ठीर आणि अर्जुन या दोघांना पापमोचिनी एकादशी व्रताचे महत्त्व सांगितले होते; असे सांगतात. पापमोचिनी एकादशीला केलेल्या व्रताने ग्रहांचा अशुभ प्रभाव दूर करण्यास मदत होते. यामुळेच या व्रताचे महत्त्वा जास्त आहे.

हिंदू पंचागानुसार यंदा पापमोचिनी एकादशीच्या व्रताचे पालन सोमवार २८ मार्च २०२२ या दिवशी करायचे आहे. चैत्रातील कृष्ण पक्षातल्या एकादशीची सुरुवात रविवार २७ मार्च २०२२ रोजी संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी झाली आहे. ही एकादशी सोमवार २८ मार्च २०२२ रोजी संध्याकाळी ४ वाजून १५ मिनिटांनी संपणार आहे. पण पापमोचिनी एकादशीच्या व्रताचे पालन सोमवार २८ मार्च २०२२ या दिवशी करायचे आहे.

Papmochani Ekadashi 2022 Date And Shubh Muhurta : पापमोचिनी एकादशी २०२२ शुभ मुहूर्त

पापमोचिनी एकादशी २०२२ – सोमवार २८ मार्च २०२२

एकादशीची सुरुवात – रविवार २७ मार्च २०२२ रोजी संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी

एकादशीची समाप्ती – सोमवार २८ मार्च २०२२ रोजी संध्याकाळी ४ वाजून १५ मिनिटांनी

सर्वार्थ सिद्धि योग – २८ मार्च रोजी सकाळी ६ वाजून १६ मिनिटांपासून दुपारी १२ वाजून २४ मिनिटांपर्यंत

द्वादशीची समाप्ती – मंगळवार २९ मार्च २०२२ रोजी दुपारी २ वाजून ३८ मिनिटांनी

एकादशीच्या व्रतानंतरचे पहिले जेवण  – मंगळवार २९ मार्च २०२२ रोजी सकाळी ८ वाजून ४३ मिनिटे

पापमोचिनी एकादशीचे महत्त्व, Papmochani ekadashi vrat significance

पापमोचिनी एकादशी भगवान विष्णू यांना समर्पित आहे. या दिवशी विष्णू देव आणि त्यांची पत्नी माता लक्ष्मी यांची मनोभावे पूजा करतात. या पूजेमुळे घरात सुखसमृद्धी नांदते. अडचणी आणि संकटे दूर होतात. संतानप्राप्तीसाठी या व्रताचे महत्त्व खूप जास्त आहे. पापमोचिनी एकादशीच्या दिवशी पहाटे उठून पती आणि पत्नी या दोघांनी आंघोळ करून घ्यावी. नंतर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची मनोभावे पूजा करावी. विष्णू सहस्त्रनामाचा जप करावा. पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या (राई) तेलाचा दिवा लावा. कारण पिंपळाच्या झाडावर ब्रह्मदेव, विष्णूदेव आणि महेश अर्थात भगवान शंकर यांचे वास्तव्य असते असे म्हणतात.

ग्लोबल न्युज नेटवर्क: