मराठी कलासृष्टीने उमद्या कलावंताला गमावलं’; मुख्यमंत्र्यांनी वाहीली श्रद्धांजली

 

मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. मुंबईच्या गिरगावात वास्तव्यास असलेल्या प्रदीप पटवर्धन त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्यानं मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

नाटक, मालिका ते सिनेमा अशा तिन्ही माध्यमांवर प्रदीर पटवर्धन यांनी आपला ठसा उमटवला होता. त्यांच्या निधनानंतर अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सिनेसृष्टीसह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील प्रदीप पटवर्धन यांना श्रद्धांजली वाहत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी कलासृष्टीने उमद्या कलावंताला गमावलं अशा शब्दांत दुख: व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत म्हटलंय, ‘मराठी रंगभूमीवरील मोरूची मावशी, बायको असून शेजारी, लग्नाची बेडी तसेच मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या सहजसुंदर अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे सदाबहार अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने मराठी कलासृष्टीने उमद्या कलावंताला गमावले आहे’.

Team Global News Marathi: