मराठा समाजाची एक वेळा नाही तर एक लाख वेळा माफी मागायची माझी तयारी आहे

 

शिंदे-फडणवीस सरकारमधील आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मराठ्यांना ‘आरक्षणाची खाज’ सुटली आहे, असे अत्यंत आक्षेपार्ह व बेजबाबदार विधान केले होते या विधानामुळे मराठा समाजाचा रोष सावंत यांनी अंगावर ओढवून घेतला होता. सत्तांतर झाल की लगेच विरोधकांना मराठा आरक्षणाची खाज सुटली आहे. असं वादग्रस्त वक्तव्य उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनी केले आहे.

यांना आरक्षण पाहिजे. आता म्हणतात ओबीसी मधून पाहिजे. उद्या म्हणतील एस सी मधून पाहिजे याचा सगळा करता करविता कोण हे सगळ्यांना चांगल माहीत असंही ते म्हणाले. दोनवेळा आरक्षण गेल्यानंतर मराठा समाज गप्प राहिला. पण आता राज्यात सत्तांतर होताच तुम्हाला लगेच मराठा आरक्षणाची खाज सुटली, असे वक्तव्य तानाजी सावंत यांनी केले आहे.

दरम्यान, या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाल्यानंतर आता तानाजी सावंत यांनी पुन्हा एकदा भाष्य केले आहे.टीव्ही 9 सोबत बोलताना सावंत म्हणाले, ज्या मराठा समाजाच्या जीवावर मी कॉलर ताठ करून हिंडतो, त्याची एक वेळा नाही तर एक लाख वेळा माफी मागायची माझी तयारी आहे. मात्र माझं वक्तव्य पूर्णपणे ऐकून घ्यावं. त्याचा विपर्यास करू नये, असं स्पष्टीकरण सावंत यांनी दिलंय.

‘ 2020 च्या वेळी मराठा आरक्षण रद्द झालं. देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण मिळवून दिलं. त्याचा काही तरुणांना फायदाही झाला. पण आरक्षण रद्द झाल्यापासून ते कालचं सरकार येईपर्यंत कोणत्याही मराठा नेत्यानं यासंदर्भात भाष्य केलं नाही.. पण शिंदे-फडणवीस सरकार आलं, तशा विकृती जागृत झाल्या. मग हे आरक्षण यातून मिळालं पाहिजे, ते आरक्षण त्यातून मिळालं पाहिजे, अशा मागण्या सुरु झाल्याचं तानाजी सावंत म्हणाले.

Team Global News Marathi: