मराठा आरक्षणावर आज सुप्रीम कोर्टात ऑनलाईन सुनावणी

मुंबई : मराठा आरक्षण संदर्भात आज सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन पद्धतीने सुप्रीम कोर्टात ही सुनवाई होणार आहे. मागच्या ५ फेब्रुवारीला मराठा आरक्षणावरची सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर आता महत्वाच्या विषयावर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.

मराठा आरक्षणप्रकरणी ५ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार होती. मात्र ती सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. आज या आरक्षणाप्रकरणी सुनावणी होणार आहे. ८ मार्च ते १० मार्च दरम्यान विरोधक आपली बाजू मांडतील तर १२ ते १७ मार्च दरम्यान राज्य सरकार आपली बाजू सुप्रीम कोर्टात मांडणार आहे अशी माहिती मिळत आहे.

कोरोना संसर्गामुळे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही सुनावणी पार पडत आहे. मात्र व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी न घेता प्रत्यक्ष सुनावणी घ्यावी, अशी मागणी मराठा संघटना करत आहे. मात्र मराठा संघटनांनी मागणी केली असली तरी प्रत्यक्षात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनवाई होणार आहे.

Team Global News Marathi: