मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुप्रिया सुळे यांनी साधला भाजपावर निशाणा |

 

नवी दिल्ली | राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलेला असताना संसदेच्या पावसाळी अधिवेशनातसुद्धा मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी हा मुद्दा अधिवेशनात उपस्थित केला. यावरून राष्ट्रवादी कॉग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला.

भाजपच्या पोटात मराठा आरक्षणाविषयी आकस आहे. केंद्र सरकारच्या आणि भाजपच्या धोरणात तफावत आहे का?, असा प्रश्न सुप्रिया सुळेेंनी अधिवेशनात उपस्थित केला. २०१८ साली केंद्र सरकारने राज्यांचे अधिकार काढून घेतल्यामुळेच मराठा आरक्षण टिकलं नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सुप्रिया सुळे दिल्लीमध्ये माध्यमांसोबत संवाद साधत होत्या. संसदेचे वरिष्ठ सभागृह राज्यसभेत १२७ व्या घटनादुरूस्तीचे विधेयक मंजूर झालं. याविषयी सुप्रिया सुळे बोलताना म्हणाल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षणाविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदींची ची भेट घेतली होती.

महाराष्ट्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती केल्यामुळेच केंद्र सरकारने १२७ व्या घटनादुरूस्तीचे विधेयक मांडले. याचबरोबर ५० टक्के आरक्षण रद्द करण्याची मागणी केली होती पण केंद्र सरकारने अर्धच काम केलं. भाजपचे खासदार वेगळं बोलतात आणि मोदी सरकार वेगळे निर्णय घेतं असतं. भाजप नेते नारायण राणे आणि रावसाहेब दानवेंचा अभ्यास असताना ते संसदेत बोलले नाहीत. त्यामुळे भाजपच्या पोटात मराठा आरक्षणाविषयी आकस आहे हेच सिद्ध होतं असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

Team Global News Marathi: