मराठा आरक्षण संदर्भात चंद्रकांत पाटलांनी केलेल्या आरोपांवर मंत्री अशोक चव्हाण म्हणतात की

राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्दा चांगलाच गाजताना दिसत आहे. त्यात काल कोल्हापूर येथे पत्रकार परिषद घेऊन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी अशोक चव्हाण यांच्यावर आरोप लगावला होता. यावर मंत्री अशोक चव्हाण यांनी आता उत्तर दिले आहे.

केंद्र सरकार मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात वेगळे सांगते आणि महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे नेते दुसरेच काही सांगतात. मराठा आरक्षण हा राजकारणाचा विषय नाही. या विषयाच्या आधारे भाजपने लोकांच्या भावनांशी खेळू नये, दिशाभूल करू नये आणि खोटेही बोलू नये” असा टोला चव्हाण यांनी लगावला होता.

अशोक चव्हाण यांनी 102 व्या घटना दुरुस्तीनंतर राज्यांना आरक्षण देण्याचा अधिकार राहिलेला नसल्याचे म्हटले, असे चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी एका पत्रकार परिषदेत सांगितले. पण पाटील चुकीचे विधान करत आहे असा आरोप चव्हाण यांनी केला होता.

“अॅटर्नी जनरल यांच्या भूमिकेविषयी विधीमंडळातील माझ्या निवेदनाबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेली विधाने चुकीची आहेत. चंद्रकांतदादा हे एक वरिष्ठ नेते असून, त्यांनी खोटे बोलून लोकांची दिशाभूल करणे योग्य नाही. राज्यांच्या अधिकारांबाबत ॲटर्नी जनरल यांची भूमिका महाराष्ट्राला अजिबात मान्य नाही” असे अशोक चव्हाण म्हणाले.

Team Global News Marathi: