मंत्रिपदाबाबत विचारताच बच्चू कडू म्हणाले की

 

शिंदे गटात सामील झाल्यानंतर पहिल्यांदाच अपक्ष आमदार बच्चू कडू यांना आज माध्यमांनी छेडले असता, त्यांचा चेहरा खुलला. दिव्यांग मंत्रालयाचे मंत्रिपद मिळाले तर आनंद होईल. तळागाळापर्यंत मंत्री म्हणून नाहीतर सेवक म्हणून काम करेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडाळी करुन राज्यात सत्ता स्थापन केली. त्यावेळी अपक्ष आमदारांनी त्यांना पाठिंबा दिला होता. त्यात अमरावती जिल्ह्यातील अपक्ष आमदार बच्चू कडू यांचा मोठा पुढाकार होता. सत्ता स्थापनच्या वेळी बच्चू कडू यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडेल, अशी दाट शक्यता होती. पण सत्ता स्थापनेपासून त्यांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली. पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारातही त्यांना संधी मिळाली नाही. त्यानंतर त्यांनी त्यांचा पक्ष लहान असल्याचा दावा करत जाहीर नाराजी व्यक्त केली होती.

पण हे रिटर्न गिफ्ट येथेच संपले नाही. राज्य सरकारने कडू यांच्या आग्रही मान्यतेनंतर देशात पहिल्यांदाच राज्यात दिव्यांग मंत्रालयाची स्थापना केली. अवघ्या २४ दिवसांत मुख्यमंत्र्यांनी या मंत्रालयाला मंजूरी दिल्याचे कडू यांनी सांगितले. १९९५पासून यासाठी लढा सुरु असल्याचे ते म्हणाले.

Team Global News Marathi: