मंत्रिमंडळ विस्तारासाठी आता मोर्चे काढावे लागतील, सतेज पाटलांचा शिंदे सरकारला इशारा

शिवसेना फोडल्यानंतर भाजपशी युती करून सरकार स्थापन केलेल्या राज्यातील शिंदे सरकारचा अजूनही विस्तार झालेला नाही. आतापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहावेळा दिल्ली दौरा करूनही मंत्रिमंडळ विस्तारावर अजूनही शिक्कामोर्तब झालेले नाही. अशातच राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याने आता विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

आमदार सतेज पाटील यांनी मंत्रिमंडळ विस्तारासाठी आता मोर्चे काढावे लागतील, असा इशारा दिला आहे. किमान दोन्ही गटाचे चार पाच मंत्री करा, प्रशासकीय बदल्या अडकल्या आहेत, अनेक कामे प्रलंबित असल्याचे ते म्हणाले. गोव्यासारखं महाराष्ट्रासारख्या राज्यात फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कारभार चालवू शकत नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. महाराष्ट्राच्या भवितव्याच्या दृष्टीने हे चिंताजनक असल्याचे ते म्हणाले.

शिवसेना फोडल्यानंतर भाजपशी युती करून सरकार स्थापन केलेल्या राज्यातील शिंदे सरकारचा अजूनही विस्तार झालेला नाही. आतापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहावेळा दिल्ली दौरा करूनही मंत्रिमंडळ विस्तारावर अजूनही शिक्कामोर्तब झालेले नाही.

 

राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याने आता विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आमदार सतेज पाटील यांनी मंत्रिमंडळ विस्तारासाठी आता मोर्चे काढावे लागतील, असा इशारा दिला आहे. किमान दोन्ही गटाचे चार पाच मंत्री करा, प्रशासकीय बदल्या अडकल्या आहेत, अनेक कामे प्रलंबित असल्याचे ते म्हणाले. गोव्यासारखं महाराष्ट्रासारख्या राज्यात फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कारभार चालवू शकत नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. महाराष्ट्राच्या भवितव्याच्या दृष्टीने हे चिंताजनक असल्याचे ते म्हणाले.

Team Global News Marathi: