मंत्री आव्हाडांची गाडी ट्रॅफिकमध्ये अडकली, पोलिसानं समोरच्या जीपवाल्याला थप्पडच लगावली!

 

राज्यात विशेष करून मुंबई, पुणे सारख्या शहरात वाहतूककोंडी काही नवी नाही. परंतु जर एखाद्या मंत्र्याचीच गाडी या वाहतूककोंडीत अडकली तर नवलंच म्हणावं लागेल. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे कोल्हापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी विविध ठिकाणी भेटी दिया होत्या मात्र त्यांच्या या दौऱ्यात त्यांना वाहतूककोंडीचा सामना करावा आगळा होता.

यावेळी वाहतूककोंडीतून वाट करून देताना पोलिसांचीही चांगलीच दमछाक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यांच्या ताफ्याला वाट करून देताना मात्र एका पोलिसानं वाहनचालकावर हात उगारल्याची घटना घडली आहे. याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. जितेंद्र आव्हाड यांच्या गाड्यांचा ताफा कोल्हापूरातील एका चौकातून जात होता. त्यावेळी त्या ठिकाणी वाहतूककोंडी झाली होती.

आव्हाड हे कोल्हापूरात अंबाबाईच्या दर्शनाला जात होते. त्यावेळी त्यांचा ताफा वाहतूककोंडीत अडकला. यावेळी वाहनांमधून वाट काढताना पोलिसांची मात्र चांगलीच दमछाक झाली. अशातच त्यांच्या पुढे असलेल्या एका वाहनाला बाजूला करताना एका पोलिसानं वाहनचालकावर हात उगारला. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आणि सोशल मीडियावर व्हायरलही झाला.

Team Global News Marathi: