मनसुख हिरेन यांचे शेवटचे लोकेशन वसईत, अनेक प्रश्न होत आहेत उपस्थित

अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीच्या मालकाचा मृतदेह सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. त्यात आता दुसरं गूढ समोर आलं आहे त्यामुळे पोलीस तपास यंत्रणा सुद्धा चक्रावून गेली आहे. सदर प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार मनसुख हिरेन यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन्स वसई गावात होते. त्यामुळे हिरेन ठाण्यावरून वसईत कशासाठी गेले होते? तिथे ते कोणाला भेटले? भेटलेल्या व्यक्तींशी काय चर्चा केली? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

ठाणे पोलिसांनी मनसुख हिरेन यांच्या मोबाईलचे लास्ट लोकेशन शोधून काढले आहे. त्यानुसार बुधवारी रात्री साडे दहा वाजता ते वसईतील एका गावात असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे हिरेन वसईत कोणत्या गावात गेले? कशासाठी गेले होते? तिथे ते कुणाला भेटले? भेटलेल्या व्यक्तींशी काय चर्चा केली? असे सवाल केले जात असून याबाबतचं गूढ आणखीनच वाढलं आहे.

मनसुख यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात करण्यात आले. काल रात्री उशिरापर्यंत हे पोस्ट मार्टम सुरु होते. चार डॉक्टरांच्या टीमने मिळून हे पोस्टमार्टम केलं. या पोस्ट मार्टमचे चित्रीकरण देखील करण्यात आले. मनसुख हिरेन यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर त्याचा अहवाल घेऊन सहाय्यक उपायुक्त अविनाश अंबुरे हिरेन यांच्या घरी दाखल झाले. यानंतर अविनाश अंबुरे यांच्याकडून हिरेन कुटुंबियाना अहवाल दाखवण्यात आला मात्र मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

Team Global News Marathi: