मनसे सोडून जाणाऱ्यांना मी बघून घेईन

 

राज्यात होणाऱ्या महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली असून फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सुद्धा ऐन निवडणुकीच्या तोंडावर जोरदार धक्के बसताना दिसून येत आहे. दरम्यान मनसेने मेळावा भरवत आणि सुमारे८०० जणांना मनसेत प्रवेश देत शक्ती प्रदर्शन केले आहे.

सदर मनसेच्या या मेळाव्यात मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी पक्ष सोडून जाणाऱ्यांना मी बघून घेईल असा सज्जड दम दिला आहे. आमदार यांनी सांगितले की एक भव्य कार्यक्रम लवकर होणार आहे. त्या कार्यक्रमात मनसेची ताकद काय हे माहीत पडेल. कोणी भ्रमात राहू नये. फक्त अफवा पसरविली जात आहे. हा चालला, तो चालला, कोणी जात नाही. कोणी जाणार नाही. कोणी गेला तर त्याला बघून घेईन, असा सज्जड दम त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.

आमदार पाटील यांनी सांगितले की, कल्याण डोंबिवली मनपा निडणुकीच्या तोंडावर पक्ष सोडून जात असल्याची अफवा पसरवली जात आहे. मात्र कोणी पक्ष सोडून जाण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना मी बघून घेईन, असे राजू पाटील यांनी म्हटले. तसेच मनसे आमदार यांनी आपल्या भाषणात सांगितले की फोडाफोडीचे राजकारण करू नका आम्हाला करता येते. मनसे पक्ष सोडून गेलेले भोंगे लोकसभा निवडणुकीत विकले गेले होते, माझी पण आमदारकी यांनी विकली असती असे सुद्धा आमदार पाटील यांनी बोलून दाखविले होते.

Team Global News Marathi: