मनीषा कायंदेंनी केला नारायण राणेंचा ‘करेक्ट कार्यक्रम’

 

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या आमदार मनीषा कायंदे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर हल्लाबोल केला. एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमात कायंदे यांची मुलखात घेण्यात आली. यावेळी त्यांनी राणेंवर सडकून टीका करत त्यांच्या ‘करेक्ट कार्यक्रम’ केला. राणे यांच्याकडे एक कलमी कार्यक्रम आहे. तो म्हणजे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याचा, असे म्हणत कायंदे यांनी ठाकरेंना सुनावले.

या वृत्तपत्राच्या कार्यक्रमात कायंदे यांच्यासोबत भाजपचे नेते अतुल भातखळकर, काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी, दिपाली सय्यद, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे उपस्थित होते. कार्यक्रमात नेत्यांनीच नेत्यांना प्रश्न विचारले. त्यावर त्यांची धमाल उत्तरे दिली. तसेच एकमेकांना टोलाही लगावले.

या कार्यक्रमामध्ये तीन राऊंड होते, पहिल्या राऊंड होता, ‘काढा डिटेक्टर’ यामध्ये नेत्यांना काही प्रश्न विचारण्यात आले. दुसरा राऊंड होता ‘ईडी’ म्हणजेच ‘इकडचा डॉन’, या राऊंडमध्ये नेत्यांनीच नेत्यांना प्रश्न विचारायचे होते. तीसरा राऊंड ‘करेक्ट कार्यक्रम’ होता. यामध्ये उपस्थितांना काही कार्ड देण्यात आले होते. त्यामध्ये एक कार्ड त्यांनी निवडायचे होते. त्यावर फोटो असलेल्या नेत्याला ट्रोल करायचे होते. यामध्ये ठाकरे गटाच्या नेत्या कायंदे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीकेची झोड उडवली.

नारायण राणे केंद्रात लघु शुक्ष्म, मध्यम, मंत्री आहेत. त्यांनी महाराष्ट्रात प्रकल्प आणले पाहिजेत. निदान कुकुट पालन तरी वाढावे, त्यांच्याकडे नियमीत एक कलमी कार्यक्रम असतो, तो म्हणने उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणे. केंद्रात मंत्रीपद मिळाले त्यामुळे राज्यातील राजकारणात हस्तक्षेप करून त्यांनी भाजपाची डोकेदुखी वाढवू नये. त्यांचा एक पक्ष होता. तो आता नाहीसा झाला. आमच्यावर बोलण्यापेक्षा त्यांच्या अंगणात असलेली दोन धोतऱ्याची फुले आहेत, ती त्यांनी सांबाळावी. ते ज्या पक्षात गेले त्या पक्षाची वाटच लागली. त्यामुळे आम्ही भाजपला शुभेच्छा देतो, असे म्हणत कायंदे यांनी नारायण राणे आणि त्यांच्या पुत्रांवर निशाणा साधला.

Team Global News Marathi: