माणसाला माणसाची गरजच नाही ? वाचा सविस्तर-

माणसाला माणसाची गरजच नाही ?
सचिन जोग

आज सकाळीच उठलो तर कळाल कि शेजारच्या गाडगीळ काकांना दवाखान्यात Admit केलंय . मग तयार होऊन दवाखान्यात गेलो काकू होत्या बसलेलेया काकांचा डोळा नुकताच लागलेला, चौकशी केल्यावर काकू सांगू लागल्या. . . . . . . . . . ” रात्री अचानक छातीत दुखायला लागल म्हणून Admit केल”.

मी म्हटलं काकू मला उठावयाच ना मी आलो असतो, तुम्ही एकट्या काय केल असत (मला माहित होत कि त्यांचा मुलगा आणि सून वेगळे राहतात). . . . . .

अरे मला काहीच नाही कराव लागल फक्त हॉस्पिटल ला फोन केला त्यांची रुग्णवाहिका आली त्यांनीच सगळ केल पुढच आमच मेडीक्लेम आहे पैसे पण नाही भरावे लागले सगळ व्यवस्तीत झाल कुणाची गरजच काय. . . . . . . . . . खर आहे मी म्हटलं…

थोडा वेळ बसलो आणि बोलायची पद्धत म्हणून बोललो काही लागल तर सांगा ????? आणि निघालो चालता ना डोक्यात चक्र फिरायला लागल कि खर आहे काकुनचं कुणाला कुणाची गरज च काय राहिले आहे आजकाल.

एका फोन वर सगळी काम होतायेत, कुणी आल फोन करा हव ते order करा ……. कुणी गेल तरी…….……. ?? फोन करा आणि हव तेच मागवा……. साध्या साध्या गोष्टीच घ्याना कुठे जायचं असेल तर कुणाला तरी रीक्षा टॅक्सीला थांबवायला लागायचं पण आता एक फ़ोन करा दाराशी येते…। what’s App , फेस बुक वर रोज भेट होते कुणाकडे जायची गरज नाही, शेजारी जाऊन गप्पा मारण्या पेक्षा ऑन लाईन गप्पा मारता येतात कि. दुकानांत जाण्याची गरज नाही ऑन ईन order करा सगळ घरी येत… जर डोळे उघडून बघितल तर कळेल कि माणसाला माणसाची गरज च राहिली नाहीये

कुणाचही कुणाशिवाय अडत नाही. एकुलता एक मुलगा नवरा बायको बस तीघेच त्याला एकत्र कुटुंब म्हणजे काय तेच माहित नाही मग शेजार धर्म कसा कळणार? मित्र तर दरवर्षी नवीन आणि जुने फेस बुक वर फक्त लाईक मारण्यासाठी… फ्रेंडशिप डे ला हातावर नाव लिहिल कि झाल. मग त्यांना हृदयावर नाव कोरणारा मित्र कसा कळणार ????

अजुनही माझ्या शाळेमधल्या मित्रांबरोबर What’s app वर गप्पा होतात . दोन तीन महिन्यांमधुन आम्ही एकत्र भेटतो गप्पा मारतो. पण तेव्हा प्रत्येकजण म्हणतो त्यावेळी सायकल वर टांग मारून रपेट मारण्याची मजा आता नाही. हल्ली च्या मुलांना व्यायाम हा जिम मध्ये जाऊन करावा लागतो. मोकळ्या हवे साठी Out Of India Tour plan करावी लागते. आमच्या लहानपणी सायकल वर टांग मारून जवळपास असलेल्या ठिकाणांना भेटी देणं पण outing होतं. त्यामधली मजा out of India Tour मध्ये कशी येणार????

एकूणच काय सोलो ट्रीप च्या जमान्यात मित्रांबरोबरच्या सहली चा आनंद कसा समजणार? कारण आता एकट्यानेच मजा करण्यात रममाण झालेली पिढी आहे त्यांना माणसांची गरजच काय समजणार?

ग्लोबल न्युज नेटवर्क: