मला कोणत्याही मंत्रीपदाची अपेक्षा नाही, आमदार अब्दुल सत्तार यांनी गायले शिंदे गटाचे गोडवे

 

महाविकास आघाडी सरकार कोसळले व एकनाथ शिंदे आणि भाजप यांनी सोबत येऊन राज्यात सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर शिवसेनेतील नेते व बंडखोर आमदार यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली. शिवसेना खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांनी या काळात मंडळ आमदारांवर सडकून टीका केली. बंडखोर आमदारांकडूनही संजय राऊत यांना उत्तर देताना मोठ्या प्रमाणात टीकेचा पाऊस पडला. दरम्यान शिवसेनेचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार हे पहिल्यांदाच औरंगाबाद येथे पोहोचले.

यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘आज पर्यंत माझ्या आयुष्यात जेवढा निधी मला मिळाला नाही तेवढा या चार दिवसात मिळाला आहे. मला कोणत्याही मंत्रीपदाची अपेक्षा नाही मागच्या दोन ते दीड वर्षांमध्ये बाकी राहिलेले सर्व कामे मंजूर करून आलो आहे. शिंदेकडे येण्यासाठी सर्व जण रांगेत उभे आहे परंतु, त्याचा निर्णय शिंदे घेतील.’ असे देखील यावेळेस ते म्हणाले.

यावेळी बंद करण्यासाठी तुम्हाला पैसे मिळाले आहेत का असे विचारले असता सत्तर म्हणाले की, ‘संजय राऊत यांनी आई बापाची शपथ घेऊन सांगावं की खासदार होण्यासाठी किती कोटी दिले. त्यामुळे एकनाथ शिंदे हे आता आमचे मुख्यमंत्री आहेत, ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे. माझ्याकडे सध्या खूप मोठा पद आहे ते म्हणजे एका कार्यकर्त्याचं पद. मागील चार दिवसांत विकासासाठी भरपूर निधी मिळाला आहे असेही यावेळी सत्तार म्हणाले. सर्वसामान्यांना जसा मुख्यमंत्री आवास असेच एकनाथ शिंदे हे आहेत त्यामुळे हे सर्वसामान्यांचे सरकार असल्याचे अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

Team Global News Marathi: