मला आणि नरेंद्र मोदींना दिल्लीत पोहचवण्यासाठी पत्रकारांची मोठी मदत, रामदास आठवले यांचे सूचक विधान

 

पुणे | सतत वादग्रस्त विधान करत चर्चेत राहणारे तसेच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्यात आणि पंतप्रधान मोदी यांच्यामध्ये साम्य असलेल्या गोष्टीवर भाष्य केले आहे. मोदी यांना पत्रकारांनीही गुजरात येथून दिल्ली येथे पोहोचविले. पत्रकारांनी मोदींना मोठा सपोर्ट केला. मलाही दिल्ली माहीत नव्हती, मला दिल्लीपर्यंत पोहोचविण्यात पत्रकारांचा हात आहे, असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) अध्यक्ष रामदास आठवले यांनी पिंपरी- चिंचवड येथील एका कार्यक्रमात सांगितले. यावेळी त्यांनी विविध विषयावर भाष्य केले होते.

आठवले म्हणाले, कायदा झाला तरी अत्याचार होतात. अजूनही दलितांवर अत्याचार होतात. त्यामुळे केवळ कायदे करून चालणार नाही. कायद्याची अंमलबजावणी आवश्यक आहे. कोरोना काळात शासनाने अनेक घटनांना मदत जाहीर केली. तशी पत्रकारांसाठी देखील मदत उपलब्ध होणे आवश्यक आहे. नरेंद्र मोदी हे लोकप्रिय पंतप्रधान आहेत. पत्रकारांनी त्यांना नेहमीच मदत केली आहे. त्यामुळे पत्रकारांच्या समस्या, अडचणी मोदींना माहिती आहेत. त्यामुळे मोदी हे पत्रकारांचे प्रश्न सोडवतील. त्यासाठी मी स्वतः यांना बोलणार आहे.

सध्याचे राज्य सरकार हे पडणार असल्याच्या अफवा पसरवली जात आहे. मात्र हे सरकार जाणार नाही, जाणार असते तर ते कशाला आले असते? हे सरकार यापुढेही २० वर्षे राहणार आहे. देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे सरकार बदलण्यात एक्सपर्ट आहेत. सगळ्यांना सत्ता मिळत नाही. तशी मंत्रीपदीही सर्वांना संधी मिळत नाही. मात्र, राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला की, मंत्रीपदी संधी न मिळालेल्या आमदारांमध्ये नाराजी होऊन हे सरकार पडेल, अशा अफवा पसरवल्या जात आहेत. मात्र सरकार पडणार नाही, असा ठाम विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला.

Team Global News Marathi: