महिलांबाबतच्या त्या विधानानंतर बाबा रामदेव यांनी अखेर मागितली माफी

 

महिला साडी नेसल्यावर, सलवार कुर्त्यावरही चांगल्या दिसतात आणि काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात. असं वादग्रस्त विधान बाबा रामदेव यांनी केलं होतं.या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटताना दिसले. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी याप्रकरणी त्यांना नोटीसही पाठवली होती. यानंतर आता बाबा रामदेव यांनी महिला आयोगाच्या नोटिशीला उत्तर दिलं आहे.

माझ्या विधानाचा गैरअर्थ काढला असल्याचा दावा बाबा रामदेव यांनी केला आहे. तरीही त्या शब्दाने कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमा मागतो, असंही ते म्हणाले. आपल्या पत्रात त्यांनी म्हटलं, की मी नेहमी महिला सक्षमीकरणाच्या दिशेनं काम केलं आहे. जेणेकरून महिलांना समाजात समानतेचा दर्जा मिळण्यास मदत व्हावी. महिलांचा अपमान करण्याचा माझा कोणताही उद्देश नव्हता.

ठाण्यात आयोजित करण्यात आलेला संपूर्ण कार्यक्रम महिलांच्या सशक्तीकरणाशी संबंधित होता. कार्यक्रमातील काही सेकंदाची क्लिक सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आली. ज्यामुळे माझ्या शब्दांचा चुकीचा अर्थ घेतला गेला. मात्र, तरीही कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी क्षमा मागतो, असं त्यांनी म्हटलं आहे.

रामदेव बाबा – ठाण्यात मोफत योग शिबिराचं आयोजन करण्यात आले होतं. या कार्यक्रमात बोलताना रामदेव बाबा म्हणाले, की महिला साडी नेसल्यावर चांगल्या दिसतात. सलवार सूटमध्येही छान दिसतात. माझ्यासारखे महिलांनी काही नाही घातले तरी त्या छान दिसतात. त्यांच्या या विधानानंतर तीव्र पडसाद उमटताना दिसले. महिला आयोगाने त्यांना नोटीस पाठवली तर राष्ट्रवादीने मुंबईत रस्त्यावरुन उतरून आंदोलन केलं. आता अखेर रामदेव बाबांनी आपल्या वक्तव्याची चुकीचा अर्थ घेतला गेला असल्याचं सांगत माफी मागितली आहे

 

Team Global News Marathi: