महागाईविरोधात काँग्रेसचे आंदोलन दिल्ली पोलिसांकडून गुन्हा दाखल

 

नवी दिल्ली | महागाई आणि बेरोजगारीविरोधात काँग्रेसच्या देशव्यापी आंदोलनानंतर आता दिल्ली पोलिसांनी पक्षावर मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी आंदोलनात सहभागी सर्व कार्यकर्त्यांवर आणि नेत्यांवर गुन्हा दाखल केला आहे. यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. आज आपल्या देशात निषेध करणे आणि आपले मत व्यक्त करणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे त्यांना जे काही करायचे आहे ते ते करू शकतात, अशी टीका राहुल गांधी यांनी केलीय.

शुक्रवारी काँग्रेस पक्षाने महागाई आणि बेरोजगारीविरोधात देशभरात मोठ्या प्रमाणावर निदर्शने केली होती. सर्वात तीव्र विरोध दिल्लीत दिसून झाला. नवी दिल्लीत कलम 144 लागू झाल्यामुळे काँग्रेसच्या मोर्लाला परवानगी नव्हती. असे असतानाही काँग्रेस नेत्यांनी मात्र निदर्शने केली. दरम्यान, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह अनेक नेत्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले.

आंदोलनात सहभागी झालेल्या काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांवर पोलिसांनी एफआयआर नोंदवल्याबद्दल काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले, ‘भाजप एफआयआर नोंदवू शकतो. त्यांना हवे ते करू शकतात. आज आपल्या देशात निषेध करणे आणि आपले मत व्यक्त करणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे त्यांना जे काही करायचे आहे ते करू शकतात. काँग्रेसच्या निदर्शनांसंदर्भात दिल्ली पोलिसांनी तुघलक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Team Global News Marathi: