विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचा दणदणीत विजय; पुणे, औरंगाबाद, नागपूर महाविकास आघाडीकडे

मुंबई : विधानपरिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या  पाच जागांपैकी चार जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळवला आहे. भाजपने पुणे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघाची जागा गमावली आहे.

शिवाय औरंगाबादमध्येही राष्ट्रवादीने बाजी मारली. तर शिक्षक मतदारसंघात पुण्याची जागा काँग्रेसने तर अमरावतीची जागा अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांनी जिंकली. केवळ धुळे-नंदुरबार विधानपरिषद पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार अमरिश पटेल यांनी बाजी मारली.

या सर्व मतदारसंघांसाठी 1 डिसेंबरला मतदान झालं. पुणे, औरंगाबाद, नागपूर या पदवीधर आणि पुणे, अमरावती शिक्षक मतदारसंघ आणि धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतरादरसंघासाठी मतदान झालं होतं. कालपासून या निवडणुकांची मतमोजणी होत असून धुळे नंदुरबारमध्ये भाजपच्या अमरीश पटेलांनी दणदणीत विजय मिळवला.

महत्त्वाचे निकाल

पुणे पदवीधर – अरुण लाड (राष्ट्रवादी) – विजयी

पुणे शिक्षक – जयंत आसगावकर, काँग्रेस – आघाडीवर

नागपूर पदवीधर – अभिजीत वंजारी (काँग्रेस) – आघाडीवर

औरंगाबाद पदवीधर – सतीश चव्हाण (राष्ट्रवादी) – विजयी

अमरावती शिक्षक – अपक्ष उमेदवार किरण सरनाईक – आघाडीवर

ग्लोबल न्युज नेटवर्क: