महसूल खाते न मिळाल्यामुळे नाराज आहात का? चंद्रकांत पाटील म्हणाले की,

 

शिंदे-फडणवीस सरकार मंत्री मंडळाचा विस्तार झाला असून खातेवाटपही जाहीर झाले आहे. शिंदे गटामध्ये नाराजी असताना भाजपमध्येही मोठे बदल झाले आहे. चंद्रकांत पाटील यांच्याकडे असलेले महसूल खाते हे राधाकृष्ण विखे पाटील यांना देण्यात आले आहे. आता नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस हे समर्थ आहे, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी पुढे बोलण्याचं टाळलं.

कोल्हापूरमध्ये चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला. यावेळी माध्यमांशी बोलत असताना चंद्रकांत पाटील यांनी खातेवाटपावर प्रतिक्रिया दिली.’आमच्या सरकारमध्ये कुणीही खातेवाटपावर नाराज नाही. नाराजी संपवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस समर्थ आहे कोणीही काळजी करू नये, मला अतिशय उत्तम खात मिळालं आहे. कोणताही खातं छोटे नसतं. एक नंबर दोन नंबर नसतं.

संघटना काम पाहत असते त्यानुसार जबाबदारी मिळत जाते’, अशी प्रतिक्रिया पाटील यांनी दिली. ‘सामना हे दैनिक शिवसेनेचं मुखपत्र आहे. उद्धव ठाकरे हे आता विरोधी गटात आहे, त्यामुळे त्यांना टीका करण्याचा अधिकार आहे. २०१४ ते २०१९ युतीच्या काळातही सामना टीका करत होता आता तर विरोधक झालाय विरोधकांनी टीका करायची असते असा टोला त्यांनी लगावला होता.

Team Global News Marathi: