महाराष्ट्रात शिवसेना संपतेय, केवळ भाजप राहणार; जे पी नड्डा यांचे मोठे विधान

 

राज्यात शिवसेना पक्षात दोन गट पडलेले असताना आता दुसरीकडे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी मोठं वक्तव्य केले आहे. महाराष्ट्रातून शिवसेनाही संपत चालली असून केवळ भाजपच राहणार असल्याचे नड्डा यांनी म्हटले. रविवारी पाटणामध्ये भाजपच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या हस्ते बिहारमधील काही जिल्ह्यातील भाजप कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना नड्डा यांनी भाजपची ताकद वाढत असून देशात भाजपच राहणार असल्याचे वक्तव्य केले.

नड्डा यांनी म्हटले की, भाजपशी दोन हात करण्याची क्षमता कोणत्याही पक्षात नाही. भाजपविरोधात लढण्यासाठी आता कोणताही राष्ट्रीय पक्ष शिल्लक राहिलाच नाही. काँग्रेस 40 वर्षानंतरही भाजपला आव्हान देऊ शकत नाही असेही नड्डा यांनी म्हटले. पक्षाची विचारधारा मजबूत असून लोक ज्या पक्षात 20 वर्ष राहिलीत, तो पक्ष सोडून भाजपात प्रवेश करत आहेत, असेही नड्डा यांनी म्हटले.

काँग्रेस आता देशातून संपत असल्याचे सांगत नड्डा यांनी प्रादेशिक पक्षांवरही हल्लाबोल केला. भाजपचा लढाई वंशवाद आणि परिवारवादाशी आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष हा घराणेशाहीतला पक्ष आहे. तर, बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाशी दोन हात करत आहोत. ओडिशामध्ये नवीन पटनाईक यांचा पक्ष हा एका व्यक्तीचा पक्ष आहे. महाराष्ट्रातही शिवसेना आता संपत असून पक्षात घराणेशाही आहे. काँग्रेसदेखील आता बहिण-भावांचा पक्ष झाला असल्याची टीका नड्डा यांनी केली.

‘साहेब घात झाला’ म्हणत ठाण्याचे शिवसेना खासदार राजन विचारे यांनी लिहीलं धर्मवीर आनंद दिघेंना भावनिक पत्र

हिटलरच्या सोन्याच्या घड्याळाचा इतक्या लाख डॉलरला लिलाव

Team Global News Marathi: