महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा, नारायण राणे यांची गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून मागणी

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून माजी मंत्री आणि भाजपा खासदार नारायण राणे आणि नितेश आणि निलेश राणे दोन्ही पुत्र आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. त्यात आता खासदार नारायण राणे यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावू करावी असे पत्र केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना लिहिले आहे.

राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन वांझे प्रकरणात प्रतिक्रिया दिलेली आहे “अंबानी स्फोटक प्रकरणात पोलिसांचा वैयक्तिक कारणांसाठी वापर केला जात आहे. कुणाला तरी वाचवण्यासाठी हा सगळा खटाटोप सुरू आहे, असं नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत म्हंटले आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, आज कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. कुणाला कधी काय होईल याची काही शाश्वती राहिली नाही. विकास नाही आणि पण भ्रष्टाचार वाढला आहे. त्यामुळेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी अमित शहा यांच्याकडे करण्यात आल्याचे नारायण राणे यांनी म्हटले आहे.

तसेच वाझे प्रकरणावर बोलताना ते म्हणाले की, वाझेंची पोलीस दलात पोस्टिंग कोणी केली. दिशा सालियन प्रकरणातही वाझेंकडे पोस्टिंग कोणी दिली. पोलिस दलात वाझेंचा गॉडफादर कोण आहे? वाझेंना कोण वाचवत आहे, याची माहिती उघड झाली पाहिजे, अशी मागणीही राणेंनी केली आहे.

Team Global News Marathi: