” महाराष्ट्राची सत्ता हातात घेण्यासाठी विरोधकांचा राज्य पेटवायचा डाव”

 

आमदार अनंतराव देवरसकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना आमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी नाव न घेता भाजपवर निशाणा साधला होता. त्या म्हणाल्या की, काही लोक अमरावती शहरात आतंक करत होते. काही मुस्लीम लोकं मंदिराचं रक्षण करत होते. तर, काही हिंदू लोकं मशिदीचं रक्षण करत होते. हाच माझा देश आहे. माझा धर्म आणि माझी जात हा तिरंगाच आहे,असे म्हणाल्या. तसेच महाराष्ट्र पेटवण्याचं षडयंत्र होतं. महाराष्ट्राची सत्ता हातात घेण्यासाठी राज्य पेटवायचा डाव होता, असा अप्रत्यक्ष आरोपही यावेळी ठाकूर यांनी केला.

यावेळी बोलत असतांना ठाकूर म्हणाल्या की,’जय श्रीराम म्हटलं की संपला का सगळं, संपला का संविधान? असा सवाल यशोमती ठाकूर यांनी केला. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आपण साजरा करतोय. देशात जातीय दंगली घडवल्या जातात. दोन्ही कट्टरपंथी हे चांगले मित्र असतात आणि आपल्याला येडं बनवतात. आपल्या देशात तिरस्काराची भावना वाढवण्याचं काम सुरु आहे.’

यशोमती ठाकूर पुढे म्हणाल्या की,’राज्यात आणि देशात हिंसा वाढवण्याचं काम मोठ्या प्रमाणावर केले जात आहे. आपण संविधान दिवस साजरा करतोय आणि दुसरीकडे रामच आपला धर्म असल्याचे बोललं जात आहे. मात्र तिरंगा हाच आपला धर्म असला पाहिजे. संविधान दिवस आहे एकोप्याचा दिवस आहे. आजच्या दिवशी मी बोलली नाही तर कुठंतरी चुकल्या सारखं होईल, असं यशोमती ठाकूर म्हणाल्या. मी जय श्रीराम म्हणाले नाही, राम रहीम म्हटलं नाही. मी संविधान साजरा केला त्यासाठी वेळ झाला. अमरावती १२ तारखेला मोर्चा झाला, नको त्या घटना घडल्या. त्यानंतर मी फेसबुक लाईव्ह केले होते.

Team Global News Marathi: