महाराष्ट्राची भाषा मराठी, गुजराती नाही, मनसेने शिकवलं ICICI बँकेला धडा !

 

राज्यात मराठी भाषेच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना अनेकदा आक्रमक झालेली पाहायला मिळावी होती. काही दिवसांपूर्वी अ‍ॅमेझॉन बरोबर झालेल्या वादात शेवटी अ‍ॅमेझॉन कंपनीने माघार घेऊन आपल्या अँपमध्ये मराठी भाषा ऍड केली होती. आता पुन्हा एकदा असाच धडा मनसेने ICICI बँकेला शिकवला आहे. ‘मुंबई, स्वस्थ रहा; सुरक्षित रहा’ या संदेशाचा गुजराती भाषेतला फलक आयसीआयसीआय बँकेने लावल्याने मनसेने बँकेला समज दिली ‘महाराष्ट्राची भाषा मराठी आहे, गुजराती नाही!’ यानंतर बँकेने हा फलक मराठीत लावून चूक दुरुस्त केली.

मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी याबाबत ट्विट केले ‘मुंबई, महाराष्ट्राची भाषा ही मराठी आहे गुजराती नाही हे आय.सी.आय.सी.बॅंकेला #मनसे_इशाऱ्यानंतर कळले. @ICICIBank ने ‘मराठी भाषा’समाविष्ट करून आपली चुक दुरूस्त केली.’ यापूर्वी सुद्धा अ‍ॅमेझॉनने आपल्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवर मराठी भाषेचा समावेश करण्याचे आश्वासन दिले, अशी माहिती अखिल चित्रे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली होती.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, यापुर्वी देखील मनसेने दादर आणि माहिममधील दुकानांवरील गुजराती भाषेतील पाट्या हटवल्या होत्या. दादरमधील एका ख्यातनाम ज्वेलर्सवर आणि माहिममधील एका हॉटेलवर मनसेने धडक दिली होती. राज ठाकरेंनी हिंदी भाषेच्या सक्तीलाही विरोध दर्शवला आहे. हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही. मग सध्या सर्वत्र या भाषेची सक्ती करण्याचे प्रयत्न का सुरु आहेत, असा प्रश्न त्यांनी केला.

Team Global News Marathi: