महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वाद, आता कोल्हापूरच्या शिवसैनिकांनी केली ही मागणी

बेळगावात कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी काल जिल्हाप्रमुखाच्या गाडीवर हल्ला करत गाडीवरील झेंडा काढून कारची तोडफोड केली होती. या घटनेचे पडसाद कोल्हापुरात उमटले होते.

या घटनेनंतर कोल्हापुरातील शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा शिवसैनिकांनी कोल्हापूर बस स्थानकावर आंदोलन केले. त्यात आता कोल्हापूर येथील शिवसैनिकांनी कर्नाटकाच्या वाहनांना महाराष्ट्रातून जाऊ न देण्याची भूमिका घेतली आहे.

शिवसेनेने राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करत कर्नाटकातून येणाऱ्या सर्व ट्रकना महाराष्ट्रात बंदी घालावी अशी मागणी केली. दुपारी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार व विजय देवणे यांनी कोगनोळी टोल नाक्यावर रस्ता रोको आंदोलन करत ही मागणी केली आहे.
तसेच काल रात्री १०:०० च्या सुमारास कोल्हापूर बस स्थानकात उभ्या असलेल्या महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या गादीवर एका अज्ञान व्यक्तीने हल्ला करून गाडीच्या काचेवर दगडफेक केली होती त्यामुळे वातावरण आणखी चिघळे होते. या घडलेल्या दोन घटनेनंतर कोल्हापुरातील शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेऊन कर्नाटकाच्या गाडीला महाराष्ट्रात बंदी घालण्याची मागणी केली आहे.

Team Global News Marathi: