राष्ट्रवादीचे संकुचित राजकारण महाराष्ट्र गेले २० वर्षे बघतोय – मनसे

 

मुंबई| मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादीमध्ये वाद होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत राज्यात जातीचा मुद्दा राष्ट्रवादीच्या जन्मानंतर मोठा झाला, असा गंभीर आरोप केला होता. यानंतर राष्ट्रवादी प्रवक्ते नवाब मलिक यांनी राज ठाकरे यांना प्रत्युत्तर देण्यात आले.

तसेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही राज ठाकरे यांच्या विधानाचा समाचार घेतला. यानंतर आता मनसेकडून राष्ट्रवादीवर पलटवार करण्यात आला असून, राष्ट्रवादीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, असा टोला लगावण्यात आला आहे.

राज ठाकरेंनी केलेल्या टीकेवर पत्रकारांनी शरद पवारांना पत्र विचारला असता. पवार म्हणाले की, मला त्याविषयी काही बोलायचे नाही. परंतु राज ठाकरेंना माझा सल्ला आहे की, प्रबोधनकारांचे लिखाण वाचा, प्रबोधनकारांचे लिखाण नक्कीच त्यांना योग्य रस्ता दाखवेल, अशी मला खात्री आहे. बाकी यावर शरद पवार यांनी काहीही भाष्य केले नाही. यानंतर आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे.

या संदर्भात संदीप देशपांडे यांनी ट्विट करून राष्ट्रवादीला टोला लगावला आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, राष्ट्रवादी चे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. पुरोगामी महाराष्ट्र म्हणायचं आणि संकुचित राजकारण करायचं हे महाराष्ट्र गेले वीस वर्षे बघत आहे.

 

Team Global News Marathi: