महाराष्ट्र कोरोनाचा हॉटस्पॉट झाला आहे-देवेंद्र फडणवीस

कणकवली: महाराष्ट्र कोरोनाचा हॉटस्पॉट झाला आहे.देशातील ३० टक्के रुग्ण महाराष्ट्र मध्ये आहे.संक्रमन वाढत आहे,संक्रमण रेशो २० टक्क्यांनी जास्त आहे.महाराष्ट्र त मृत्यू ४ टक्के मृत्युदर आहे.कोरोना स्थिती फार गंभीर आहे.अधिकाधिक तपासण्या होणे आवश्यक आहे.लाईफटाईम मध्ये अत्याधुनिक आर्टिपीसीएल लॅब झाल्याने त्याचा लाभ कोकणातील जनतेला होणार असल्याचे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.

पडवे येथील लाईफ टाईम हॉस्पिटल येथे आमदार स्थानिक विकास कार्यक्रम यांच्या विद्यमाने आर्टिपीसीआर कोविड मोलेक्युलर लॅब लोकार्पण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले.

यावेळी माजी मुख्यमंत्री खा.नारायण राणे,विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आ.रविंद्र चव्हाण, आ.प्रसाद लाड,आ.भाई गिरकर,आ.निरंजन डावखरे,अध्यक्षा निलमताई राणे,माजी खा.निलेश राणे,आ.नितेश राणे, आ.रमेश पाटील,माजी आ.प्रमोद जठार,जि. प.अध्यक्षा समिधा नाईक, माजी आ.अजित गोगटे,जिल्हाध्यक्ष राजन तेली,बँक संचालक अतुल काळसेकर,विस्वस्थ डॉ.मिलिंद कुलकर्णी,डॉ.आर.एस.कुलकर्णी,भाई सावंत,महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे,सावी लोके,सुदन बांदिवडेकर, अशोक सावंत,प्रमोद रावराणे आदी मान्यवर उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले,कोविड मोलेक्युलर व्हायरालॉजी लॅब सुरु होते,आनंदाची गोष्ट आहे.सिंधुदुर्गात मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमध्ये काढलं काय?अर्थकारण आहे.असे राणेंना विचारलं तेव्हा हे माझे स्वप्न आहे,असे दादांनी सांगितले. अत्याधुनिक प्रकारचं हॉस्पिटलमुळे महत्वाचा टप्पा आहे.कोविड साठी लॅब असली पाहिजे,हे दरेकरांनी जाणली.उपयुक्त अशी जागा होती,दादांनी पुढाकार घेतला.

आमदारांनी निधी दिला,मान्यता मिळण्यासाठी विशेष बाब केली. मोठा संघर्ष आमदारांनी केला.दरेकरांनी उपोषण करण्याची भूमिका घेतली होती.अत्याधुनिक लॅब आहे,दीड तासात ९६ तपासण्या होतील.

दिल्ली सरकारने जास्तीत जास्त तपासणी केली,त्यानंतर मृत्यू संख्या कमी झाली.सुधार होण्याचा दर चांगला आहे.
महारातरत टेस्ट वाढवा मागणी तीन महिने करतो.आता सरकारने रॅपिड टेस्ट वाढवल्या,उपयोग कमीआहेत,पण होत आहे. दोन दिवसांपूर्वी ७६ हजार टेस्ट झाल्या आहेत.टेस्ट वाढविण्याची गरज आहे,सरकारने काळजी घेतली पाहिजे.

सिंधुदुर्गात आम्ही ही व्यवस्था उभी केली,त्याच धर्तीवर सरकारने राज्यभर उभी केली पाहिजे. संख्येशी सरकार लढले, कोरोना तही महाराष्ट्र देशात प्रथम आले.यायला नको होता,अशी टीका केली.या लॅब मध्ये माकड तापाच्या टेस्ट होतील.महत्वाची जबाबदारी राणेंनी बजावली असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हायलाईट

लाईफटाईम हॉस्पिटलमध्ये कोविड मोलेक्युलर लॅबचे लोकार्पण,केवळ कोविड नव्हे तर ५२ प्रकारच्या तपासण्या होतील

आर्टिपीसीआर मशीनच्या ५ आमदारांनी १ कोटींचा निधी दिला,जिल्ह्याला अभिमान वाटेल असा आजचा क्षण

स्वँब गोल्ड स्टँडर्ड अशीही लॅब आहे,शोशल डिस्टन ठेवून लॅबचे लोकार्पण कार्यक्रम,येत्या ऑक्टोबरला १५० विद्यार्थी कॉलेज मध्ये घेणार प्रवेश…!

ग्लोबल न्युज नेटवर्क: