महाराष्ट्रातील भाजप खासदारांची दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक !

 

नवी दिल्ली | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट गेटल्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे दिल्लीला रवाना झाले आहे. या दिल्ली दौऱ्यात ते गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. त्यातच आता महाराष्ट्रातील भाजप खासदारांची उद्या दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बैठक बोलावली आहे. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. सोमवारी सायंकाळी सात वाजता भाजप खासदारांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यातील सर्व भाजप खासदारांना बैठकीसाठी उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान, दिल्लीमध्ये भाजप आमदार आशिष शेलार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात नुकतीच गुप्त बैठक झाल्याची माहिती आहे. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनाही दिल्लीतून बोलावण्यात आल्याचं समोर आलं होतं. त्यातच, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार हे नेतेही दिल्ली दरबारी येत असल्याचं फडणवीसांनी सांगितलं.

Team Global News Marathi: