महापालिका निवडणुकीसाठी येत्या शुक्रवारी आरक्षण सोडत

 

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी ओबीसी प्रवर्ग आणि सर्वसाधारण महिलांचे आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. ही सोडत शुक्रवार जुलै रोजी काढण्यात यावी, असे आदेश राज्य निवडणुक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी दिले आहेत.

आमागी निवडणुकीसाठी आरक्षित जागा निश्‍चित करण्यासाठी 31 मे 2022 रोजी आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यात अनुसूचित जमाती महिला 2 व पुरुष 1, अनुसूचित जाती महिला 11 व पुरुष 11, सर्वसाधारण महिला 57 अशा जागांवर आरक्षण सोडत काढण्यात आली होती.114 जागांपैकी 38 ओबीसी जागांसाठी 76 सर्वसाधारण जागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.

तसेच मागासवर्ग आयोगाने शिफारस केलेल्या टक्केवारीच्या प्रमाणात एकूण 50 टक्केच्यावर जाणार नाही, या मर्यादेत सर्वोच्च न्यायालयाने नागरिकांच्या मागास प्रवर्ग यांना जागा राखून राजकीय आरक्षण देण्यात येणार आहे. 26 जुलैला नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व पुरुष आणि सर्वसाधारण महिला यांच्याकरिता आरक्षित जागा निश्‍चित करण्यास करण्याकरिता जाहीर नोटीस प्रसिध्द करण्यात येणार आहे.

29 जुलैला नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व पुरुष आणि सर्वसाधारण महिला यांच्याकरिता आरक्षित जागा निश्‍चित करण्यास सोडत काढण्यात येणार आहे. 30 जुलैला आरक्षण सोडतीनंतर प्रभाग निहाय आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्द करण्यात येणार आहे. तर 30 जुलै ते 2 ऑगस्टपर्यंत प्रभाग निहाय आरक्षण निश्‍चितीवर हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी देण्यात येईल. 5 ऑगस्टला आरक्षण निश्‍चित प्राप्त झालेल्या हरकती व सुचनांवर विचार करुन प्रभागनिहाय अंतिम आरक्षण शासन राजपत्रात प्रसिध्द केले जाणार आहे.

राज्यात आजपासून चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा

शिंदे सरकारचा आणखी एक धक्का, महत्त्वाची प्रकरण सीबीआयकडे करणार वर्ग

Team Global News Marathi: