महागाई, बेरोजगारीचे प्रश्न महत्त्वाचे; मंत्री दादा भुसेंचा राज ठाकरेंना टोला

 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवलेच पाहिजे, ४ मे रोजी जर भोंगे उतरले नसतील तर मशिदीबाहेर मोठ्या आवाजात हनुमान चालीसा दुप्पट लाऊडस्पीकरवर लावू असा अल्टीमेटम सरकारला दिला आहे. राज ठाकरेंच्या या इशाऱ्यानंतर सत्ताधारी शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे. शिवसेनेचा हिंदुत्वाचा मुद्दा मनसे घेत असल्याचा आरोप राज ठाकरेंवर करण्यात येत आहे. राज ठाकरेंच्या औरंगाबाद सभेनंतर शिवसेना मंत्री दादा भुसे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

 

दादा भुसे म्हणाले की, लोकशाहीत प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. स्थानिक प्रशासन याबाबत चौकशी करून परवानगी देईल. मात्र, वैयक्तिक विचाराल तर इतरही अनेक महत्वाचे प्रश्न आहे. महागाई, बेरोजगारी हे प्रश्न आता महत्वाचे आहे.आज कोणीही बोलत असलं तरी शिवसेना कोणीही संपवू शकत नाही. ५०-६० वर्ष रक्ताचं पाणी करून बाळासाहेबांनी शिवसेना उभी केलीय. आज ते जरी मोठे नेते असले तरी बाळासाहेबांचाच आशीर्वाद आहे असं त्यांनी म्हटलं.

तसेच मंदिर मशिदीचा मुद्दा नाही. सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे त्याचं पालन करावे लागेल. मालेगावात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नच निर्माण होऊ शकत नाही. काही गावांचा इतिहास आहे पण मालेगावने चांगलं वागून नाव लौकिक केलय. पण काही लोकांनी ठरवलंच आहे तर त्याला काही करू शकत नाही असं सांगत दादा भुसे यांनी मनसेवर निशाणा साधला आहे.

Team Global News Marathi: