‘मध्य प्रदेशचं नाव खराब होतंय, नितीन गडकरी यांचं थेट शिवराज चौहान यांना लिहिलं पत्र

 

मंत्री नितीन गडकरी यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना एक पत्र लिहून इशारा दिला आहे. नितीन गडकरींचे हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच राजकीय वर्तुळात या ‘लेटर बॉम्ब’ची चर्चा सर्वजण करत आहेत. मध्यप्रदेशात चेक पोस्टवर चालणाऱ्या आरटीओच्या बेकायदा वसुलीचा गडकरींनी या पत्रात उल्लेख केला आहे.

एवढेच नाही तर मध्य प्रदेशचे नाव यामुळे खराब होत असल्याचे देखील गडकरी यांनी शिवराज सिंह चौहान यांना सुनावले आहे. मध्यप्रदेश मधील आरटीओ अधिकारी मोठ्या प्रमाणात लाच घेत आहेत. त्यामुळे ट्रकचालक व मालकांचे प्रचंड हाल होत आहेत असे गडकरी यांनी या पात्रात म्हटले आहे.

एखाद्या वाहनाची सर्व कागदपत्रे बरोबर असली आणि वाहन अंडरलोड केलेले आढळले तर कोणत्याही प्रकारचा दंड भरण्याची तरतूद नाही. असे असतानाही लाचखोर अधिकाऱ्यांकडून ट्रकचालक व मालकांना त्रास दिला जात आहे. या पत्रात नितीन गडकरी यांनी मध्यप्रदेशातील आरटीओ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून चेकपोस्ट प्रवेशासाठी मोठ्या प्रमाणावर लाच घेतली जात असल्याचे लिहिले आहे.

नितीन गडकरींनी या पत्रात पुढे लिहिलं आहे की, यापूर्वीही या प्रकरणाकडे आपलं लक्ष वेधण्यात आलं होतं, मात्र या समस्येवर कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे आता मध्य प्रदेशचे नाव खराब होत आहे. त्यामुळे या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. आता गडकरी यांच्या या पत्रावर शिवराज चौहान सरकार काय कारवाई करते हे पाहावे लागणार आहे.

एकनाथ खडसे गटाला मोठा धक्का ! भुसावळ नगरपालिकेमधील 10 नगरसेवक अपात्र

उद्धव ठाकरेंना धक्का, केंद्रीय मंत्रिमंडळात शिंदे गटाला २ मंत्रिपदे मिळण्याची शक्यता

Team Global News Marathi: