भोपाळ: ज्योतिरादित्य शिंदे यांच्या भाजपात जाण्याने मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकार कोळसले होते. यामुळे काँग्रसचे कमलनाथ सरकार पडून भाजपाने शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा सरकार स्थापन केले होते. पण त्या सरकारला बहूमत नसल्याने 3 नोव्हेंबरला 28 जागांसाठी पोटनिवडणुक झाली होती.
2018 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 230 जागा असणाऱ्या सभागृहातील 130 जागा जिंकल्या होत्या. तर भाजपाला 109 जागांवर विजय मिळाला होता. त्यामुळे काँग्रेसने अपक्ष निवडूण आलेल्या आमदारांनासोबत घेऊन राज्यात सत्तास्थापन केली होती. ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्ष सोडताना 22 आमदारांना घेऊन गेले होते. 19 जिल्ह्यामधील 28 जागांसाठीचा निकाल आज सकाळी 8 वाजल्यापासून सुरु झाली आहे.
-सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपा 14 जागा तर काँग्रेस 6 जागांवर आघाडीवर
-हाटपिपल्या विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या कमल सिंह पटेल 1668 मतांनी पुढे
– सुसवारा विधानसभा जागेवर आघाडीवर; नेपानगरमधून सुमित्रा कासडेकर आघाडीवर
– 28 जागांसाठी ग्वालेरमधील केंद्रावर मतमोजणी सुरु