आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघातील नागरिक करणार मनसेत प्रवेश
पर्यावरण, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा मतदार संघ असलेला वरळी विधानसभा मतदार संघातील सामान्य नागरिक आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करणार आहे. सदर कार्यक्रम हा कृष्णकुंज अर्थात अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवास्थानी पार पडणार आहे.
मनसेचे पदाधिकारी संतोष धुरी यांच्या नेतृत्वात अनेक जणांनी मनसेत जाहीर प्रवेश करत हातात मनसेचा झेंडा घेणार आहेत. “वरळीतील एनजीओ, सार्वजनिक मंडळे यांचे कार्यकर्ते आणि काही सामान्य नागरिकांनी मनसेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.” अशी माहिती संतोष धुरी यांनी ‘प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.
लोकप्रतिनिधी कसा असावा, तर लोकातला असावा. वरळी मतदारसंघातील मतदारांनी शिवसेनेचे उमेदवार आदित्य ठाकरे यांना विधानसभा निवडणुकीत निवडून दिलं होतं, पण काही महिन्यातच इथल्या मतदारांना त्यांच्या कामाची प्रचिती आली. सध्या कोणतीही निवडणूक नाही. परंतु राज ठाकरेंच्या नेतृत्वात काम करण्याची इच्छा या नागरिकांनी व्यक्त करत मनसेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे असे माहिती दुरी यांनी दिली आहे.