एलपीजी गॅस सिलेंडर दरात केंद्र सरकारकडून ‘इतक्या’ रूपयांची कपात

 

केंद्राने सर्वसामान्यांना मोठा दिलासा आहे. गॅस सिलिंडरवर 200 रुपये, डिझेलवर 7 रुपये आणि पेट्रोलवर 9.50 रुपयांची कपात करण्यात आली आहे. शनिवारी रात्रीपासून पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलिंडरच्या नवीन किमती लागू होणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलीये.

या संदर्भात बोलताना निर्मला सीतारामन म्हणाल्या की,आम्ही पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपये प्रति लिटरने कमी करत आहोत. यामुळे पेट्रोलचे दर प्रति लिटर 9.5 रुपये आणि डिझेलचे दर प्रति लिटर 7 रुपयांनी कमी होणार आहेत, असं त्या म्हणाल्यात.

केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या 9 कोटींहून अधिक लाभार्थ्यांना प्रति गॅस सिलिंडर 200 रुपये सबसिडी देण्याची घोषणाही केली. या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे मागच्या काही दिवसांपासून वाढत्या दरांमुळे सर्व सामान्य नागरिक बेहाल झाला होता मात्र केंद्राने केलेल्या कपातीमुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

Team Global News Marathi: